new-img

बाजार समिती निवडणूक,नांदेड मध्ये भाजपला धक्का

नांदेडमध्ये झालेल्या सहा बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत मुखेड बाजार समिती वगळता भाजप-महायुतीचा मोठा पराभव झाला आहे. तर पाच बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे. लोहा बाजार समितीत भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गटाचा पराभव झाला. चिखलीकर यांचे दाजी आमदार श्याम सुंदर शिंदे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीच्या 18 पैकी 16 जागा मिळाल्या.

नांदेड जिल्ह्यातील माहूर, बिलोली, कुंडलवाडी, उमरी, मुखेड आणि लोहा या सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर करण्यात आले. कुंडलवाडी, बिलोली व उमरी येथे महाविकास आघाडीने यश मिळवले आहे. तर माहूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, माकप आघाडीने विजय मिळवला आहे. मुखेडमध्ये भाजपाने एकूण 18 जागांपैकी 17 जागांवर विजयी मिळविला तर एका जागेवर काँग्रेसने विजय मिळवला.