राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल
- By -
- Oct 26,2023
तकरी नेते सय्यद पाशा उस्मानसाहब पटेल उर्फ पाशा पटेल यांची राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पाशा पटेल यांची दुसऱ्यांदा राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांच्या मालाला भाव शेतकऱ्यांच्या शेतमालाला किफायतशीर भाव तसेच ग्राहकांना वाजवी दरात शेतमाल खरेदी करता यावा यासाठी राज्य कृषी मूल्य आयोग स्थापन करण्यात आला आहे. कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी पाशा पटेल यांची नियुक्ती दुसऱ्यांदा झाली असून 2017 मध्येही ते अध्यक्ष होते.