new-img

महत्वाची बातमी कांदा निर्यात शुल्क रद्द निर्यात मूल्यात मात्र वाढ

केंद्र सरकारने कांद्यावर लावलेले 40 टक्के निर्यात शुल्क रद्द केले आहे. मात्र प्रति टन 400 डॉलर असलेले निर्यातमूल्य आता प्रति टन 800 डॉलर केले आहे. त्यामुळे सरकारने एक हाताने दिलं आणि दुसऱ्या हातानं डबल घेतलं, असे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. देशांतर्गत कांद्याच्या मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने लासलगावसह सर्वच बाजार समित्यांमध्ये कांद्याच्या दरामध्ये वाढ होत आहे. घाऊक बाजारात कांदा पाच हजार रुपये क्विंटलच्यावर जाताच केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्याच्या निर्यातमूल्य डॉलरमध्ये वाढ करत प्रति मेट्रिक टन 400 डॉलरवरून 800 डॉलर केले. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळामध्ये कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणी सापडणार आहे. दुसरीकडे ग्राहकांना मात्र दिलासा मिळाला आहे.