new-img

महाराष्ट्र, कर्नाटकासह 14 राज्यांत तुरीची आवक सुरू

तुरीचा आवक हंगाम आता सुरू झाला आहे. 12 जानेवारी रोजी संपलेल्या सप्ताहात एकूण 14 राज्यांतील बाजार समित्यांत आवक झाली. त्यात महाराष्ट्र (48 टक्के) आणि कर्नाटक (25 टक्के) ही राज्ये आघाडीवर होती. त्याखालोखाल तेलंगणा, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व आंध्र प्रदेश ही राज्ये महत्त्वाची होती. महाराष्ट्रात लातूर, जालना, सोलापूर, वाशीम, औरंगाबाद व बुलडाणा या जिल्ह्यांतील आवक सर्वाधिक होती. तुरीच्या किमती नोव्हेंबर महिन्यापासून कमी होत असल्या तरीही त्या रुपये 8200 च्या खाली गेल्या नाहीत. आवकेचा हंगाम सुरू झाल्यानंतर तर त्या वाढत आहेत. या सप्ताहाअखेर त्या रुपये 8784 वर आल्या आहेत.