टोमॅटोच्या नावे कांद्याची तस्करी, 82.93 मेट्रिक टन कांदा जप्त
- By -
- Feb 18,2024
टोमॅटोच्या नावाखाली परदेशात कांद्याची तस्करी होत असल्याची घटना समोर आली आहे. टोमॅटोच्या कंटेनरमध्ये 82.93 मॅट्रिक टन कांदा लपवून परदेशात पाठवण्यात येत होता. हा कांदा यूएईला पाठवण्यात येत असल्याची गोपनीय माहिती सीमा शुल्क विभागाच्या नागपूर युनिटला मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
काही दिवसांपूर्वी डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा विदेशात पाठवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला होता. डाळिंबाच्या बॉक्समध्ये कांदा भरून पाठविला जात असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. हा कांदा तस्करीचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. भारतातून विशेषता लासलगाव, पिंपळगाव यासह नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून बांगलादेश, दुबई यासह इतर देशात कांद निर्यात केला जातो.