new-img

सौंदाणे येथील शेतमाल खरेदी-विक्री केंद्रावर पहिल्या दिवसापासून बंतोष प्रणालीचा वापर

कृषी उत्पन्न बाजार समिती, मालेगाव (जि. नाशिक) अंतर्गत सौंदाणे येथील शेतमाल खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन शुक्रवारी (दि. 1) महंत अर्जूनदास महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सौंदाणे येथील खरेदी विक्री केंद्रात बंतोष सॉफ्टवेअर या संगणकीकृत प्रणालीद्वारे सर्व खरेदी-विक्री व्यवहारांची ऑनलाईन नोंद होणार असून शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना संगणकीकृत पावत्या मिळणार आहेत. बंतोष सॉफ्टवेअरच्या वापरामुळे मालेगाव ही नाशिकमधील पहिली डिजिटल बाजार समिती ठरली आहे.

कर्मवीर भाऊसाहेब हिरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून सौंदाणे (ता. मालेगाव) येथे कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत शेतमाल खरेदी विक्री केंद्राचे उद्घाटन महंत अर्जुनदास महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी सौंदाणे सरपंच चेतन पवार होते. प्रमुख अतिथी म्हणून बाजार समितीचे माजी सभापती काशिनाथ पवार, जवानसिंग मोरकर, पवन ठाकरे, संजय निकम, माजी संचालक गोरख पवार, किशोर पवार, सुनील पवार, पोपटराव पवार, भाऊसाहेब पवार, नामदेव पवार, रामचंद्र पवार, बाळू वाणी, विकी खैरनार आदी उपस्थित होते. समितीचे सभापती अद्वय हिरे यांच्या मार्गदर्शनाने सौंदाणे शेतमाल केंद्रावर शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी यांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच पहिल्या दिवसापासून शेतकरी, व्यापाऱ्यांना बंतोष सॉफ्टवेअर या संगणकीय प्रणालीद्वारे संगणकीकृत पावती उपलब्ध होणार आहे. उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी 500 वाहनांपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी कांदा विक्रीसाठी आणला होता.

यावेळी बाजार समितीचे संचालक रवोंद्र मोरे, नंदलाल शिरोळे, डॉ. उज्जैन इंगळे, संदीप पवार, सुभाष सूर्यवंशी, राजेंद्र पवार, मिनाक्षी देवरे, चंद्रकांत शेवाळे, विनोद बोरसे, रत्ना पगार, अरुणा सोनजकर, रविंद्र निकम, भिका कोतकर, रवौंद्र साळुंके, सचिव कमलेश पाटील, गोरस खैरनार, नथु खैरनार, जालिंदर शेलार, दिगंबर पगार, माधव पवार, सोमनाथ आहिस्राव, लक्ष्मण पवार, अक्षय पवार, प्रबोण छाजेड, सुशील पलोड, प्रज्वल अभोणकर, योगेश पवार आदी उपस्थित होते.