तुरीच्या उत्पादनात घट, तुरीला ९५०० ते १०००० हजारांचा भाव
- By - Team Agricola
- Mar 22,2024
तुरीच्या उत्पादनात घट, तुरीला ९५०० ते १०००० हजारांचा भाव
तुरीचे भाव सध्या तेजीत आहे. तुरीचे भाव हे आवकेच्या हंगामातही टिकून आहे. तुरीच्या गुणवत्तेनुसाकर तुरीला भाव मिळत आहे.सध्या तुरीला सरासरी भाव ९ हजार ५०० ते १० हजार रुपये मिळत आहे.
यंदा तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. त्यामुळे बाजारात आवक घटली आहे. आवक घटल्यामुळे तुरीचे दर वाढले आहे. सध्या तुरीला १०००० पर्यत भाव मिळूनही शेतकऱ्यांनी अद्याप तूर विकली नाही. एप्रिल, मे मध्ये तुरीचे भाव अजुन वाढतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे. तर एकीकडे अभ्यासकांच्या अंदाजानुसार, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही तुरीची मागणी सध्याच्या बाजारात चांगली आहे. परंतु तुरीचे उत्पादन घटले आहे .आणि मागणी वाढली म्हणून सध्याच्या तुर भाववाढीचं हे सर्वात मोठं कारण आहे. केंद्र सरकारने जरी आयात वाढवण्याचा निर्णय घेतला, तरी यंदा जी तुट पडणार आहे ती भरून निघणार नाही अस अभ्यासक म्हणत आहेत. या कारणांमुळे देशात पुढील काळातही तुरीचे भाव तेजीत राहू शकतात.