new-img

नव्या हळदीला १७,५०० रूपये भाव

नव्या हळदीला १७,५०० रूपये भाव

हिंगोली बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये आता नवीन हळदीची आवक सुरु झाली आहे. यंदाच्या हंगामात हळदीला चांगला दर मिळत आहे. तर सध्या हळदीला १७५०० रूपये भाव  मिळत आहे.


हळद खरेदीसाठी हिंगोलीत प्रसिद्ध असलेल्या हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळद खरेदीच्या नव्या हंगामाला मागील आठवड्यापासुन सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यापासुन हळदीची आवक वाढली आहे. संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळद एक दिवसाआड खरेदी-विक्री केली जात आहे.सध्या सरासरी २,००० क्विंटल हळद विक्रिसाठी येत आहे. ती अजुन वाढेल अशी शक्यता आहे. तर बाजारसमितीत आता हळदीला सरासरी १६,००० ते १९,००० पर्यंत हळदीच्या गुणवत्तेनुसार भाव मिळत आहे.यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. त्यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे.तर हळदीला मिळालेला दर शेतकऱ्यांना परवडणारा आहे.