new-img

लसणाच्या भावात काहीशी नरमाई

लसणाच्या भावात काहीशी नरमाई

मागील काही दिवसांपूर्वी लसणाच्या भावात चांगली तेजी आल्याच पाहायला मिळाल आहे. तर सध्या लसणाच्या भावात काहीशी नरमाई आली आहे. बाजारात लसणाला सरासरी दर ९००० ते १०००० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. लसणाची आवक वाढल्याने भावात काहीशी घसरण दिसून येत आहे.


२७ मार्च आज रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार लसणाला सरासरी दर हा पुणे बाजारसमितीत ११००० रूपये मिळाला आहे. तर कमीत कमी दर हा ६००० रूपये तर जास्तीत जास्त दर हा १६००० रूपये मिळाला आहे.तर राहता बाजारसमितीत सरासरी दर हा १०५०० रूपये मिळाला आहे. तर कमीत कमी दर हा ९००० ते जास्तीत दर हा १२००० रूपये मिळाला आहे. काही बाजारसमिती वगळता इतर बाजारसमितींमध्ये लसणाच्या दरात २० ते ३० टक्क्यांनी नरमाई आली आहे.