राजापुरी हळदीला मिळाला ७०,००० रूपयांचा दर
- By - Team Agricola
- Mar 27,2024
राजापुरी हळदीला मिळाला ७०,००० रूपयांचा दर
यंदाच्या हंगामात हळदीला चांगला भाव मिळत आहे. नवीन हळदीची आवक सुरू झाली आहे. २६ मार्च रोजी राजापुरी हळदीला सांगली कृषी उत्पन्न बाजारसमितीमध्ये सर्वाधिक दर ७०००० रूपयांचा मिळाला असुन तिथे २१३०६ क्विंटल हळदीची आवक झाली आहे. या बाजारसमितीत हळदीला कमीत कमी दर हा १६५०० ते जास्तीत दर हा ७०००० रूपये मिळाला असुन सरासरी दर हा ४३२५० रूपये मिळला आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार २७६ मार्च रोजी बाजारसमिती मुंबई येथे लोकल हळदीला सरासरी भाव १७५०० रूपये मिळाला. तर सेनगाव येथे सरासरी भाव १२५०० रूपये मिळाला असुन कृषी उत्पन्न बाजार समिती जिंतूर येथे नं. १ हळदीला सरासरी दर हा १४६०० रूपये मिळाला. यंदा हळदीला समाधानकारक भाव मिळत आहे. तर सध्या हळदीच्या चांगली तेजी असुन पुढील काळात भाव टिकून राहतील अस हळद बाजारातील अभ्यासक सांगत आहे.