मूगाला मिळतोय चांगला दर
- By - Team Agricola
- Apr 01,2024
मूगाला मिळतोय चांगला दर
मूगच्या भावात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तर यंदा तूरीचे भाव ही चांगलेच वाढलेत आहे. त्याबरोबर मुगाच्या दरातही तेजी आली आहे. सध्या मुगाला सरासरी ७ हजार ७०० ते ९,४०० हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज १ एप्रिल आज रोजी कृषी उत्पन्नबाजारसमिती पुणे येथे हिरव्या मूगाला सरासरी दर हा ९३५० मिळाला आहे. तर या बाजारसमितीत कमीत कमी दर हा ८९०० ते जास्तीत दर हा ९८०० रूपये मिळाला असुन मुगाची आवक ही ४१ क्विंटल झाली आहे. तर याच बाजारसमितीत ३१ मार्च रोजी मुगाला सरासरी दर हा ९२५० रूपये मिळाला असुन आवक ४२ क्विंटल मुगाची होत आहे. सध्या बाजारात मूगाची आवक कमी असल्याने मुगला चांगला दर मिळत आहे.