लिंबाची मागणी वाढली,मिळतोय चांगला दर
- By - Team Agricola
- Apr 02,2024
लिंबाची मागणी वाढली,मिळतोय चांगला दर
सध्या उन्हाळा मुळे बाजारात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अवकाळीचा फटका लिंबू बागांना बसल्याने यंदा लिंबाचे उत्पादन घटले आहे. सध्या लिंबाला बाजारात आकाराप्रमाणे दर मिळत आहे.
मध्यम आकाराच्या लिंबाला सध्या ५ रूपये तर मोठ्या आकाराचे लिंबू १० रूपयांपर्यंत विकले जात आहे. लिंबाला मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. उन्हाळा मुळे लिंबुची मागणी व किंमती देखील वाढल्या आहे. तर लिंबाला प्रतिक्विंटल दर हा १०,००० रूपयांपर्यंत मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार आज २ एप्रिल रोजी राहता बाजारसमितीत लिंबाला सरासरी दर हा ९२०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत लिंबाची आवक ही ४ क्विंटल झाली आहे. तर या बाजारसमितीत कमीत कमी दर हा ८५०० ते जास्तीत जास्त दर हा १०००० रूपये मिळाला आहे.