उन्हाळी कांदा दरात घसरण, १०० रूपये मिळतो दर
- By - Team Agricola
- Apr 09,2024
उन्हाळी कांदा दरात घसरण, १०० रूपये मिळतोय दर
कांदा दरात सतत घसरण सुरू आहे. संगमनेर बाजारसमितीत कांद्याला कमीत कमी १०० रूपये दर मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ संकट उभे राहीले आहे. मार्चअखेरमुळे बहुतांश बाजारसमित्या गेल्या दहा दिवसांपासुन बंद आहे. ४ एप्रिल पासुन लेव्हीच्या मुद्यामुळे बाजारसमिती बंद आहेत. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. नाशिकमधील बाजारसमिती बंद असल्याने अनेक शेतकरी कांदा संगमनेर कडे विक्रिसाठी नेत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ८ एप्रिल रोजी कांद्याला संगमनेर बाजारसमितीत कमीत कमी दर हा १०० रूपये मिळाला आहे. तर या बाजारसमितीत सरासरी ८५० रूपये मिळाला आहे. त्यानंतर अहमदनगर बाजारसमितीत कांद्याला कमीतकमी दर हा १५० रूपये मिळाला आहे. सरासरी दर हा १०५० रूपये मिळाला आहे. आज ९ एप्रिल रोजी पुणे बाजारसमितीत देखील लोकल कांद्यला कमीतकमी ५०० रूपये दर मिळाला असुन सरासरी १००० रूपये दर मिळाला आहे.
काही बाजारसमिती १० दिवस बंद असल्याने कांदा उत्पादक शेतकरी नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात कांद्याला १०० रूपये असा भाव मिळत असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहे