new-img

सकाळच्या सत्रात कसा आहे कांदा बाजार, काय मिळतोय शेतकऱ्यांना भाव?

सकाळच्या सत्रात कसा आहे कांदा बाजार, काय मिळतोय शेतकऱ्यांना भाव?


शेतीमालाच्या दरात मागील काही दिवसांपासुन सतत घसरण होत आहे. कांद्याने तर शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांदा दरात होणाऱ्या सततच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
कांद्याला बाजारसमितीत कवडीमोल भाव मिळत आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कांद्याला आज १२ एप्रिल रोजी सरासरी दर हा पुणे-पिंपरी बाजारसमितीत १५०० रूपये मिळाला. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा १४०० ते जास्तीत दर हा १६०० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत २१ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.
आज पुणे-मोशी बाजारसमितीत कांद्याला आज सरासरी दर हा ८५० रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत कांद्याला कमीतकमी ५०० ते जास्तीतजास्त दर हा १२०० रूपये मिळाला असुन ३७४ क्विंटल कांद्याची आवक झाली आहे.
बाजारात कांदा दरात होणाऱ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.