लिंबूच्या मागणीत वाढ, बाजारसमितीत काय मिळतोय बाजारभाव
- By - Team Agricola
- Apr 12,2024
लिंबूच्या मागणीत वाढ, बाजारसमितीत काय मिळतोय बाजारभाव
सध्या बाजारात लिंबाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे लिंबुची मागणी वाढली आहे आणि दर देखील तेजीत आहे. बाजारसमितींमध्ये सध्या लिंबुला सरासरी दर हा ६००० ते ९ हजार रूपयांपर्यंत मिळत आहे, लिंबाला सध्या त्याच्या आकाराप्रमाणे बाजारात दर मिळत आहे.
लिंबाला बाजारसमितींमध्ये सरासरी दर हा श्रीरामबाजार समितीमध्ये ८००० हजार रूपयांचा दर मिळाला आहे. तर या बाजारसमितीत दहा क्विंटल लिंबाची आवक झाली असुन कमीतकमी दर हा ६००० तर जास्तीतजास्त दर हा १०००० रूपये मिळाला आहे. राहता बाजारसमितीत सरासरी दर हा ७००० रूपये मिळत आहे.
यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे लिंबाच्या बागांना फटका बसला आहे.. त्याचा परिणाम हा लिंबु उत्पादनावर झाला असुन बाजारात लिंबाची आवक घटली आहे. त्यामुळे लिंबाचे दर वाढले आहेत. लिंबुचे भाव पुढील काळात आणखी वाढू शकतात, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.