ज्वारीला मिळतोय ४ हजार ५०० रूपयांपर्यंत भाव
- By - Team Agricola
- Apr 13,2024
ज्वारीला मिळतोय ४ हजार ५०० रूपयांपर्यंत भाव
राज्यातील बाजारसमित्यांमध्ये ज्वारीची आवक वाढली आहे. बाजारसमितींमध्ये दादर, हायब्रीड, मालदांडी, लोकल, रब्बी, शाळू आणि पांढऱ्या ज्वारीची आवक होत आहे. ज्वारीला सध्या सरासरी गुणवत्तेप्रमाणे २ हजार ते ४ हजार ५०० रूपयांपर्यंत दर मिळत आहे.
१३ एप्रिल रोजी ज्वारीला भोकरदन बाजारसमितीत सरासरी २२०० रूपये दर मिळाला आहे. तर नागपूर बाजारसमितीत हायब्रीड ज्वारीला सरासरी दर हा ३५०० रूपये मिळाला आहे. कमीतकमी दर हा ३ हजार ४०० ते जास्तीत जास्त दर हा ३६०० रूपये मिळाला आहे. पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीत मालदांडी ज्वारीला सरासरी दर हा ४२०० रूपये मिळाला आहे. तर या बाजारसमितीत ज्वारीची आवक ही ६९६ क्विंटल झाली आहे.
सध्या बाजारामध्ये मालदांडी ज्वारीला सर्वाधिक दर मिळत आहे. त्यासोबतच हायब्रीड, लोकल, ज्वारीची आवक वाढली आहे. दादर ज्वारीला देखील सरासरी दरापेक्षा चांगला दर मिळत आहे.