कांद्याची आवक वाढली, आज काय मिळतोय बाजारभाव?
- By - Team Agricola
- Apr 16,2024
कांद्याची आवक वाढली, आज काय मिळतोय बाजारभाव?
बाजारसमितींमध्ये गेल्या काही दिवसांपासुन कांद्याची आवक वाढली आहे. मात्र आवक वाढल्याने कांदा दरात सतत घसरण होत आहे. कांदा दरात होणाऱ्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार कांद्याची आवक वाढली आहे. आज १६ एप्रिल रोजी पुणे बाजारसमितीत
कांद्याची आवक ही १२३८२ क्विंटल झाली आहे. कांद्याला सरासरी दर हा १ हजार रुपये मिळत आहे. तर कांद्याला कमीतकमी दर हा ५०० ते जास्तीत जास्त दर हा १५०० रूपये मिळाला आहे. बाजारसमितींमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दरात घसरण होत आहे.
कांद्याला सध्या सरासरी दर हा ९०० ते १५०० रूपयांच्या दरम्यान मिळत आहे. कांदा दरात होणाऱ्या या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.