लाल हरभऱ्याला किती मिळतोय दर, सर्वाधिक भाव कुठे
- By - Team Agricola
- Apr 19,2024
लाल हरभऱ्याला किती मिळतोय दर, सर्वाधिक भाव कुठे
बाजारसमितींमध्ये हरभऱ्याची मागणी ही वाढली आहे. त्यामुळे गेल्या आठवड्यापासुन हरभरा दरात काहीशी सुधारणा आली आहे. हरभऱ्याला समाधानकारक दर मिळत असल्याने हरभरा उत्पादक शेतकरी समाधानी झाल्याचे पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार हरभऱ्याला सर्वाधिक दर हा १९ एप्रिल रोजी दुधणी बाजारसमितीत मिळाला आहे. या बाजारसमितीत आज हरभऱ्याला सरासरी दर हा ६४८५ रूपयांपर्यंत मिळाला आहे. तर या बाजारसमितीत हरभऱ्याची आवक ही ८४ क्विंटल झाली आहे. हरभऱ्याची आवक कमी झाल्याने दरात सुधारणा आली आहे.
बाजारात सध्या हरभऱ्याला सरासरी दर हा ५ हजार २०० ते ६ हजार २०० रुपयांच्या दरम्यान मिळत आहेत. देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटलमागे १०० रुपयांनी वाढलेले आहेत.
अभ्यासकांच्या मते दरात ५ ते १० टक्क्यांची सुधारणा होऊ शकते. पुढील महिना दीड महिना १०० ते २०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकतात, असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासाकांनी व्यक्त केला.