new-img

तुरीला कोणत्या बाजारसमितीत सर्वाधिक दर

तुरीला कोणत्या बाजारसमितीत सर्वाधिक दर 

तुरीला सध्या चांगला भाव मिळत आहे. सध्या देशात तुरीला १० हजार ५०० ते ११ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान सर्वसाधारण भाव मिळतोय. तर जास्तीत जास्त भाव १२ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रातील बाजारात तुरीचा भाव ११ हजार ते १२ रुपये आहे. तर कर्नाटकातील बाजारांमध्ये तुरीचा भाव ११ हजार ते १२ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान आहे. तर देशातील इतर बाजारांमध्येही तुरीची भावपातळी चांगली आहे. 

महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार आज नागपुर बाजारसमितीत तुरीला सरासरी दर हा ११ हजार २६४ रुपये मिळाला असुन या बाजारसमितीत १ हजार २१७ क्विंटल लाल तुरीची आवक झाली आहे. दिग्रस बाजारसमितीत तुरीला ११ हजार ३५० रुपये दर मिळाला आहे.

 यंदा बाजारात तुरीची आवक घटली आहे. मागणी वाढल्यामुळे तुरीला समाधानकारक दर हा मिळतांना दिसुन येत आहे. बाजारअभ्यासकांच्या मते यंदा तुरीचे दरात अशीच चढ राहण्याची शक्यता आहे.