new-img

पिकविमा २०२४ साठी अंतिम १५ जूलै त्वरित करा अर्ज...

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. २०२४ च्या खरीप हंगामासाठी पिक विमा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुरुवात ही झाली आहे. त्याची अंतिम मुदत जवळ आली आहे. १५ जूलै ही अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. अजूनही शेतकऱ्यांनी  पिक विमा अर्ज केला नसल्यास त्वरित करून घ्यावा. अंतिम मुदत संपल्यानंतर शेतकरी पिक विमा साठी अर्ज करू शकणार नाही. 
खरीप २०२४ साठी भात, ज्वारी, सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी, नाचणी, भुईमूग, तीळ, कारळे, कांदा ही १४ पिके विमा योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. तर या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत फक्त ४ दिवस बाकी आहेत. त्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा भरून घ्यावा, असे आवाहन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. या योजनेसाठी शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान जसे की अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, चक्रीवादळ, कीटकांच्या प्रादुर्भावामुळे होणारे नुकसान या सर्व नुकसानीसाठी शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाच्या नुकसानानुसार पंचनामे करून संबंधित नुकसान भरपाई रक्कम देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला अर्ज करून घ्यावा असे देखील आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.