new-img

टोमॅटोला मिळतोय १०० रूपये किलो बाजारभाव

टोमॅटोला मिळतोय १०० रूपये किलो बाजारभाव

गेल्या अनेक दिवसांपासून टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कारण सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी  चांगले दिवस आले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या दराचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. परंतु या वाढत्या दराचा सर्वसामान्यांना मात्र फटका बसत आहे.
घाऊक बाजारात टोमॅटोच्या किंमती ८० ते १०० रूपये किलोपर्यंत आहेत. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहीतीनुसार २ ऑगस्ट रोजी पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीत टोमॅटोला सरासरी भाव हा १७५० रूपये मिळाला आहे. मुरबाड बाजारसमितीत टोमॅटोला सरासरी ५५०० रूपये भाव हा मिळाला आहे. कामठी बाजारसमितीत ४००० रूपये भाव हा मिळाला आहे. राजधानी दिल्लीत टोमॅटोचे किरकोळ भाव पुन्हा एकदा १०० रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहेत.
टोमॅटोचे भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. असे असले तरीदेखील दरात वाढ होताना दिसत आहे. हवामानाचा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. त्यामुळं टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे. पुढच्या काळात आणखी टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.