सरकारचा मोठा निर्णय, १ नोव्हेंबरपासून सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार
- By - Team Agricola
- Sep 13,2024
सरकारचा मोठा निर्णय
१ नोव्हेंबरपासून सातबारा उताऱ्यावर आईचे नाव लावणार
महाराष्ट्र सरकारकडून महिलांच्या प्रगतीसाठी विविध योजना राबवल्या जातात. महाराष्ट्र सरकारनं महिलांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यापैकी एक म्हणजे राज्य सरकारनं सरकारी कागदपत्रांमध्ये आईचं देखील नाव प्राधान्यानं नोंदवलं जावं यासाठी निर्णय घेतला होता. याच निर्णयाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं भूमी अभिलेख विभागानं देखील महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सातबारा उताऱ्यावर देखील आईचं नाव नोंदवलं जाणार आहे. 1 नोव्हेंबर पासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात १ मे २०२४ नंतर ज्यांचा जन्म झाला असेल त्यांच्या नावावर जमीन खरेदी केल्यास त्याची नोंद करताना संबंधिताच्या आईचे नाव सातबाऱ्यावर नोंदवणं बंधनकारक करण्यात आलं आहे.