new-img

सोयाबीनला बाजारसमितीत हमीभावापेक्षा कमी दर

सोयाबीनला बाजारसमितीत हमीभावापेक्षा कमी दर 
किती मिळतोय भाव

अमरावती- ४१५० रू
नागपूर - ४३५५ रू
हिंगोली- ४१५० रू
अकोला- ४२५५ रू


शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारसमितीत हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने 2024-25 साठी हमीभावात वाढ केली आहे. या वर्षासाठी ४८९२ रूपये क्विंटल भाव सरकारने जाहीर केला आहे. तरीही शेतकऱ्यांच्या सोयाबीनला बाजारात हमीभावापेंक्षा कमी दर मिळत आहे. 
सोयाबीन उत्पादक शेतकरी चिंतेत आले आहेत. एकीकडे नविन सोयाबीन काढणी सुरू झाली आहे. दुसरीकडे बाजारात सोयाबीनची आवक ही फारशी वाढलेली नाही. दर कमी मिळत असल्याने शेतकरी  सोयाबीन घरात ठेवत आहेत. अमरावती बाजारसमिती वगळता इतर सर्व बाजारसमितीत सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. अमरावती बाजारसमितीत आज १६४५८ क्विंटल सोयाबीनची आवक झालेली आहे.