कांद्याला बाजारसमितीत किती मिळतोय बाजारभाव?
- By - Team Agricola
- Oct 26,2024
कांद्याला बाजारसमितीत किती मिळतोय बाजारभाव?
शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात सरासरी समाधानकारक असा बाजारभाव मिळत आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी ४४५० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
पुणे- पिंपरी बाजारसमितीत कांद्याला सरासरी ४५०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार २६ ऑक्टोबर २०२४ रोजी पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत कांद्याला सरासरी ४४०० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. पिंपळगाव बसवंत बाजारसमितीत कांद्याची आवक ६९०० क्विंटल झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर २५०० ते जास्तीतजास्त दर ४८९२ रूपये मिळाला आहे. अमरावती बाजारसमितीत कांद्याला सरासरी भाव २७०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत ४०५ क्विंटल कांद्याची आवक झालेली असुन कमीतकमी दर १६०० जास्तीतजास्त दर ३८०० रूपये मिळाला आहे. कोल्हापूर बाजाारसमितीत कांद्याला सरासरी ३३०० रूपये भाव मिळाला आहे. तर या बाजारसमितीत कमीतकमी दर १५०० क्विंटल मिळाला असुन जास्तीतजास्त दर ५५०० रूपये मिळाला आहे. तर आवक ही ६९९२ क्विंटल झाली आहे.
बाजारभाव
कोल्हापूर- ३३०० रू
अमरावती- २७०० रू
पिंपळगाव बसवंत- ४४०० रू