new-img

हरभऱ्याला बाजारसमितीत मिळतोय सरासरी ८ हजार रूपये बाजारभाव

हरभऱ्याला बाजारसमितीत मिळतोय सरासरी ८ हजार रूपये बाजारभाव

शेतकऱ्यांच्या हरभऱ्याला बाजारसमितीत समाधानकारक असा बाजारभाव मिळत आहे. सरासरी ८ हजार रूपयांपर्यंत भाव मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारसमितीत हरभऱ्याला कमीतकमी दर ४७०० रूपये मिळत आहे. पुणे बाजारसमितीत सरासरी भाव हा ७९०० रूपयांपर्यंत  मिळत आहे. कमीतकमी दर ७४०० ते जास्तीतजास्त दर ८४०० रूपये मिळत आहे. कारंजा बाजारसमितीत सरासरी दर हा ५४०० रूपये मिळाला आहे. नागपूर बाजारसमितीत सरासरी ६७०० रूपये भाव मिळाला आहे.