new-img

शेतकऱ्यांच्या गव्हाला बाजारात मिळतोय समाधानकारक भाव

शेतकऱ्यांच्या गव्हाला बाजारात मिळतोय समाधानकारक भाव

बाजारसमितीत शेतकऱ्यांच्या गव्हाला समाधानकारक भाव मिळत आहे. गव्हाचे भाव तेजीत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये 
आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 
सध्या गव्हाला प्रतिक्विंंटल भाव हे २५०० ते ३ हजार रूपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. सणासुदीच्या पार्श्वभुमीवर गव्हाला बाजारात चांगली मागणी  वाढली होती त्यामुळे शेतकऱ्यांच्या गव्हाला बाजारात चांगला भाव मिळत आहे. त्यासोबत गेल्या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे बाजारात आवक कमी झाल्याने शेतकऱ्यांच्या गहू दराला बाजारसमितीत आधार मिळत आहे. सध्या गव्हाचे भाव तेजीत असुन पुढील काही दिवस गव्हाचे भाव असेच तेजीत राहण्याची शक्यता बाजारअभ्यासकांनी व्यक्त केली आहे