ऊस गाळपसाठी २०० साखर कारखान्यांचे परवान्यासाठी अर्ज
- By - Team Agricola
- Nov 11,2024
ऊस गाळपसाठी २०० साखर कारखान्यांचे परवान्यासाठी अर्ज
राज्यात या महिन्यात ऊस गाळप हंगाम सुरू होणार आहे. यासाठी राज्यभरातील आतापर्यंत २०३ साखर कारखान्यांनी परवाना मिळवण्यासाठी अर्ज केले आहेत. मात्र गाळपाला निश्चित केव्हापासून सुरवात होईल याबाबत मनामध्ये संभ्रम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अजून ४ ते ५ साखर कारखान्यांकडून अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २०२४-२५ या हंगमासाठी १०१ सहकारी तर १०२ खासगी कारखान्यांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. कृषी विभागाने दर्शवलेल्या अंदाजानुसार राज्यात ११.६७ लाख हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. तर साखर आयुक्तालयाने खासगी संस्थेकडून मागवलेल्या अहवालानुसार यंदा ऊस १३.७० लाख हेक्टरच्या पुढे उपलब्ध असल्याची माहिती आहे. ऊस गाळप परवान्यासाठी केलेल्या अर्जाची छाननी होणार आहे. शासकीय देणगी थकवणाऱ्या कारखान्यांना लगेच परवाना दिला जाणार नाही अशी माहिती साखर आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.