महायुती सरकारमुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य
- By - Team Agricola
- Nov 14,2024
महायुती सरकारमुळे शेतकऱ्यांचे वीज बिल शून्य
पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात जाव लागायच. काही ठिकाणी वन्य प्राणी, साप यांच्यामुळे शेतकऱ्यांना जीव धोक्यात टाकून हे काम करावे लागायचे. आणि यामुळे विविध घटनाही घडायच्या. शेतकऱ्यांचा हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने महत्वाचा निर्णय घेतला त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा अखंडित वीज मिळणार आहे. शेतकऱ्यांचे वीज बील कसे माफ होईल या सर्व प्रश्नावर महायुती सरकारने लक्ष घालून हा प्रश्न सोडवला आणि अखेर शेतकऱ्यांचा शेतात रात्रीच्या वेळी पाणी द्यायचा असो वा वीज बील माफीचा प्रश्न महायुती सरकारने सोडवला..